महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 4, 2022, 6:37 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ETV Bharat / videos

Marathi cheer girls : बैलगाडी शर्यतीत थिरकल्या चक्क मराठमोळ्या चिअर गर्ल्स, पाहा व्हिडिओ..

पुणे - खेड तालुक्यातील पांगरी येथे काल बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत चक्क चिअर गर्ल्स ( Marathi cheer girls Pangri bullock cart race ) थिरकलेल्या पाहायला मिळाल्या. तालुक्यातील पांगरी येथे दरवर्षी रोकडोबा महाराजांच्या यात्रेचा उत्सव असतो. यावर्षी बैलगाडी शर्यतीवरची बंदी उठल्यानंतर या उत्सवात मोठ्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेच्या या उत्सवात चिअर गर्ल्स नाचताना दिसल्या. चिअर गर्ल्सनी अगदी मराठमोळा साज चढवत, महाराष्ट्राची शान असलेली नऊवारी साडी नेसत, तसेच या परंपरेला शोभेल अशी नथ नाकात घालून, अगदी पारंपारिक वेशभूषा परिधान करून मराठी गाण्यांवर थिरकल्याचे पाहायला मिळाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details