Maratha Mahasangh Hunger Strike : संभाजीराजे छत्रपतींच्या उपोषणाच्या समर्थनार्थ अकोल्यात मराठा महासंघाचे उपोषण - Sambhajiraje marathi news
अकोला - मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास बसले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अकोला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात ( Maratha Mahasangh Hunger Strike ) आले. यावेळी मराठा आरक्षण, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व्याजाची मर्यादा वाढवावी, प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह सुरु करावे, आंदोलन करणाऱ्या तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावेत, आत्महत्यग्रस्त तरुणांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्यात यावी, अशा मागण्या या उपोषणात करण्यात आल्या. याप्रसंगी विनायक पवार, कृष्णा अंधारे, अविनाश नाकट, संजय सूर्यवंशी, सचिन शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST