महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Prithviraj Patil meet Sharad Pawar : महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने घेतली शरद पवारांची भेट - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

By

Published : Apr 11, 2022, 9:53 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

मुंबई: महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील ( Maharashtra Kesari Prithviraj Patil ) याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांची आज मुंबईत भेट घेतली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ही भेट झाली. यावेळी पृथ्वीराज पाटीलच्या पुढील वाटचालीसाठी शरद पवारांनी त्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी ऑलिम्पिकसाठी पृथ्वीराज पाटील याला कोणतीही मदत लागल्यास तीही देण्यासाठी शरद पवारांनी आश्वासन दिले आहे. राज्य कुस्ती परिषदेचे अध्यक्ष शरद पवार असले तरी महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा ( Maharashtra Kesari Competition ) पाहण्यासाठी शरद पवार उपस्थित नव्हते. कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील याने 5-4 च्या फरकाने मुंबई पश्चिमचं नेतृत्त्व करणाऱ्या विशाल बनकरला मात दिली आहे. विशेष म्हणजे जवळपास 21 वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details