Viral Video : निफाड तालुक्यातील शिंगवे शिवारात बिबट्याचा मुक्त संचार - नाशिक वनविभाग
निफाड ( नाशिक):- तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील गावांमध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यातच सुखदेव रोडीबा डेर्ले यांच्या उसाच्या शेतात वनविभागाने विहिरी जवळ लावलेल्या पिंजर्यात अंदाजे तीन वर्षाचा बिबट्या जेरबंद झाल्याची घटना ताजी असताना रविवारी रात्रीच्या दरम्यान बाबुराव कुटे या शेतकऱ्याच्या गव्हाच्या शेतात रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मुक्त संचार होत आहे. मोबाईल कॅमेऱ्यात रस्त्याने जाणार्या एका नागरिकाने कैद केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाला झाले आहे. कदाचित सावजाच्या शोधात रस्ताच्या कडेला बिबट्या दबा धरून बसला होता. वन विभागाने जास्त पिंजरे लावत गोदाकाठ परिसरातील गावे बिबटे मुक्त करावे अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST