Aryan Khan Case : एनसीबीकडे पुरावे नसल्याने वेळ काढूपणा, वकील आली काशीद खान देशमुखांचा आरोप - वकील काशीद खान देशमुखांचा एनसीबीवर आरोप
मुंबई - आर्यन खान प्रकरणात एनसीबी एसआयटीकडून आरोपपत्र दाखल करण्याकरीता मागण्यात आलेली मुदत ही केवळ तपासामधून वेळ काढूनपणा असल्याची टीका या प्रकरणातील आरोपी मुनमुन धमेजा यांचे वकील आली काशीद खान देशमुख यांनी केली आहे. एनसीबीला NDPS ऍक्टनुसार 180 दिवस कायद्यात पहिलेच दिलेले आहे. जर एनसीबीकडे या प्रकरणात काही सबळ पुरावे असते, तर त्यांनी न्यायालयासमोर ठेवले असते. मात्र 90 दिवसांचा वेळ मागण्याकरीता ज्या प्रमाणात यांच्या वतीने युक्तिवाद केला, त्यात केवळ उडवाउडवीचे उत्तर असल्याचे दिसून आले. याप्रकरणात एनसीबीकडे कुठलेही पुरावे नाही. केवळ व्हाट्सअप त्याच्या आधारावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असेही आली काशीद खान देशमुख यांनी सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST