jockey shroff Visit Family In Maval : फार्म हाऊसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे जॉकी श्रॉफ सांत्वन - jockey shroff In Pune
पुणे - बॉलिवूड चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते जॉकी श्रॉफ ( jockey shroff Visit Family In Maval ) यांनी मावळातील एका कुटुंबाच्या घरी भेट दिली आहे. श्रॉफ यांचं मावळात फार्म हाऊस असून सागर गायकवाड हा तरुण तिथे काम करतो. सागरच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. याची माहिती मिळताच जॉकी श्रॉफ यांनी सागर च्या घरी जाऊन गायकवाड कुटूंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अभिनेता जॉकी श्रॉफ ( jockey shroff In Maval ) यांचे चांदखेड येथे फार्म हाऊस आहे. तिथे काम करणारा सागर गायकडवाचे वडील दिलीप यंचे निधन झाल्याची माहिती जॉकी श्रॉफला मिळाली होती. त्यामुळे गायकवाड कुटुंबियांच्या सांत्वनासाठी जॉकी श्रॉफ त्यांच्या घरी गेला होता. यावेळी त्याने जमीनीवर बसून लहान मुले, घरातील वृद्ध आजी यांच्याशी गप्पा मारल्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST