Silver Oak Attack : ..म्हणजे तुम्ही पवारांचं मुंडकं उडवण्याची भाषा करताय : जितेंद्र आव्हाड आक्रमक - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
ठाणे : शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील घरावर झालेल्या हल्ल्याच्या ( Sharad Pawar Home Silver Oak Attack ) निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Housing Minister Jitendra Awhad ) यांच्यासोबत गांधी पुतळ्यासमोर मूक निदर्शने ( NCP Protest Against Silver Oak Attack ) केली. या आंदोलनात आव्हाड यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते महिला कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. गांधी हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी या संपूर्ण प्रकाराचा निषेध केला. पन्नास वर्षे एसटी कामगारांच्या सोबत त्यांच्या अडीअडचणी सोडविणाऱ्या शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. अमरावतीतील डीजेवरून जितेंद्र आव्हाड संतप्त झालेले पाहायला मिळाले. राणा कुटुंबीयांनी कालच्या आंदोलनाची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी केल्याने आव्हाडांनी राणा कुटुंबियांचा चांगलाच समाचार ( Jitendra Awhad Criticized Ravi Rana ) घेतला. म्हणजे तुम्ही पवारांचं मुंडकं उडवण्याची भाषा करताय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST