Video : जया एकादशी निमित्ताने विठुरायाच्या गाभाऱ्यात झेंडू फुलांची आरास - pandharpur temple
पंढरपूर - श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने माघी यात्रा जया एकादशी निमित्त श्री.विठ्ठल रूक्मिणी माता मंदिरात सुंदर आरास तयार केली आहे. त्यामुळे विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात, मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी फुलांची सजवून केली आहे. जया एकादशी निमित्ताने विठूरायाच्या भेटीसाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोना प्रादुर्भावामुळे माघ यात्रा होऊ शकली नाही. मात्र यंदा राज्य सरकारने कोणत्या प्रकारचे निर्बंध न लावता माघ वारीला परवानगी दिली आहे. विठ्ठल मंदिर समितीकडून नियमांचे पालन करून भाविकांना विठ्ठल मंदिरात प्रवेश दिला जात आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाकडून योग्य ते नियोजनही करण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST