Jalgaon youth stranded in Kiev : युक्रेनमधील किव्ह शहरात अडकला जळगावचा तरूण;सरकारकडे मदतीची मागणी - Jalgaon youth stranded in Kiev
जळगाव - डॉ. सौरभ विजय पाटील, अयोध्या नगर जळगाव हा तरूण एमएसच्या शिक्षणासाठी युक्रेनला गेला आहे. नेमकं ज्या युक्रेनच्या राजधानीत असलेल्या किव्ह शहरावर रशिया हल्ला करीत आहे. त्याच शहरात एका होस्टेलमध्ये जळगावचा सौरभ पाटील हा अडकलेला आहे. सौरभ राहत असलेल्या ठिकाणी बाँम्ब गोळ्याचे आवाज येतात. आता बाहेर पडता येत नसल्याने खाण्याच्याही वस्तू संपल्या आहेत. पाणीही विकत मिळत नसल्याने ते सुध्दा संपण्याच्या मार्गावर आहे. हल्ल्यात युक्रेनमधील गॅसची पाईपलाईनही ब्रेक झाल्याने गॅसचा पुरवठाही बंद झाला आहे. बाहेर काहीही मिळत नाहीये. सर्व बंद आहे, कर्फ्यू लागलायं, रात्री बे रात्री बॉम्बचे आवाज, फायरिंग यामुळे झोपही लागत नाही. तर दुसरीकडे झोपूही दिले जात नाही. एम्बेसीकडून कुठलीही मदत मिळालेली नाही. (Jalgaon youth stranded in Kiev) तीन दिवसांपासून केवळ मदतीचा सांगितले जात आहे. येथून बाहेर पडण्यासाठी सरकारन मदत करावी अशी मागणी सौरभाने केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST