Rajesh Tope : आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी चालवली बुलेट.. कार्यकर्ता म्हणाला, 'पैसे फिटले..' - Rajesh Tope Bullet Ride
जालना : जालना येथे एका कार्यकर्त्याने आणलेल्या नव्या बुलेटचा शुभारंभ करताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना बुलेट चालवण्याचा मोह आवरला ( Minister Rajesh Tope Drive Bullet ) नाही. रांजणी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शेख यांनी बुलेट घेतली. मात्र, त्याचा शुभारंभ आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते करायचा होता. त्यामुळे ते टोपे यांच्या निवासस्थानी बुलेट घेऊन आले. यावेळी टोपे यांनी आपल्या घरासमोरच बुलेटवर फेरफटका ( Rajesh Tope Bullet Ride ) मारला. आपल्या आवडत्या मंत्र्याने गाडी चालवल्यानंतर कार्यकर्त्याने 'माझे पैसे फिटले' अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी कार्यकर्त्यानी हा प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय. अनेकदा राजकीय व्यक्तींना कामाच्या गडबडीत दुचाकी चालविण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे बुलेट चालविण्याची ही संधी टोपे यांनी सोडली नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST