VIDEO : राज्यात महिलांना राजकारणात 40 टक्के संधी दिली तर चांगलंच - मंत्री यशोमती ठाकूर - लडकी हूं लड सकती हूं
पुणे - ज्याप्रमाणे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी ( Congress Leader Priyakna Gandhi ) यांनी उत्तर प्रदेश येथे लडकी हू लड सकती हू अंतर्गत 40 टक्के महिलांना तिकीट दिली आहे. तसे जर राज्यात झालं तर खूपच चांगलं होईल, असे मत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर ( Minister Yashomati Thakur in Pune ) यांनी व्यक्त केले आहे. प्रियंका गांधी यांनी दिलेला नारा "लडकी हूं लड सकती हूं, म्हणजे देशातील मुली आणि स्त्रिया आपल्या अधिकारासाठी लढू शकतात, हा संदेश या घोषणेतून त्यांनी दिला आहे. लडकी हूं लड सकती हूं, या कार्यक्रमास १२५ दिवस पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या वतीने महिला रॅलीचे आयोजन पुण्यातील गुडलक येथे करण्यात आले होते. यावेळी 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीने मंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी संवाद साधला. पाहा, त्या काय म्हणाल्या?
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST