मुळा मुठा नदी पुनरुज्जीवनाचा प्रश्न लवकरच सुटणार - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे - मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन
पुणे - सीओईपी महाविद्यालयाच्या 94 व्या वार्षिक जलक्रीडा महोत्सवाचे उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले, यावेळी त्यांनी सांगितले की, कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर अतिशय सुंदर असा कार्यक्रम पाहायला मिळाला. यावेळी मुळा-मुठा नदीच्या ( Mula Mutha river revival Aditya Thackeray ) पुनरुज्जीवनाबाबत आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी मुळा मुठा नदीच्या पुनरुज्जीवन विषयावर चर्चा झाली आहे. या चर्चेमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. जसे की नदीच्या पुनरुज्जीवनामध्ये नदीचे वाढलेले काँक्रिटीकरण हा मुद्दा होता. यावरती आम्ही सध्या काम करत असून, लवकरच सर्व प्रश्न मार्गी लावू. तसेच, राज्यातील गोदावरी, मिठी, आदी नद्यांचे देखील काम आम्ही हाती घेतले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST