VIDEO : हिंसाचारानंतर अमेरिकेतील संसद सदस्य लपले बाकाखाली - अमेरिकेच्या संसदेत हिंसाचार
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत धुडगूस घालत तोडफोड केली. जो बायडेन यांच्या विजयावर शिक्कामार्तब करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले होते. मात्र, यावेळी ट्रम्प समर्थक मोठ्या संख्येने संसदेबाहेर जमले होते. त्यांनी सुरक्षा कवच तोडत इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. संसदेत ट्रम्प समर्थकांनी तोडफोडही केली. यावेळी सिनेट आणि काँग्रेस सदस्यांना बाकाखाली लपण्याची वेळ आली. पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना बाहेर हुसकावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांसोबतच्या झटापटीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहितीही मिळत आहे.