तब्बल चार महिन्यांनंतर टोकियो डिस्नेलँड पर्यटकांसाठी खुले..! - टोकियो डिस्नेलँड व्हिडिओ
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जगभरात लागू केलेले लॉकडाऊन आता हळूहळू उघडत आहे. टोकियोमधील डिस्नेलँडही तब्बल चार महिन्यांनंतर आज (बुधवार) पर्यटकांसाठी खुले झाले. कोरोना विषाणू अद्यापही पूर्णपणे नष्ट झाला नसल्याने, खबरदारीचे उपाय लागू करुन हे पार्क सुरू करण्यात आले आहे. ३७.५ पेक्षा जास्त तापमान असलेल्या, किंवा कोरोनासंबंधी लक्षणे दाखवणाऱ्या लोकांना याठिकाणी प्रवेश नाकारला जातो आहे. तसेच, प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना फेस मास्क घालणे आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. गर्दी टाळण्यासआठी डिस्नेलँडची सिग्नेचर परेड आणि काही विशेष कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, तसेच, यासाठीची तिकीटे केवळ ऑनलाईन बुक करता येणार आहेत असेही पार्क प्रशासनाने स्पष्ट केले आहे.