VIDEO : तैवानने सागरी सुरक्षेसाठी बनवली स्वदेशी बोट - चीन तैवान वाद
चीन आणि तैवानमध्ये मागील काही दिवसांपासून छुपे युद्ध सुरू आहे. त्यात अमरिका तैवानला मदत करत असल्याने चीनचा पारा चढला आहे. नुकतेच अमेरिकेने तैवानला लढाऊ विमाने देण्याचा निर्णय घेतला आहे. आता तैवानने समुद्रातील सुरक्षेसाठी स्वदेशी बोट तयार केली असून कोस्ट गार्ड विभागाकडून या बोटीचा वापर करण्यात येणार आहे. तैवान सामुद्रधुनीत मागील काही दिवसांपासून अमेरिकेने सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. चीनला तैवान आणि अमेरिकेकडून शह दिला जात आहे. तैवानच्या राष्ट्रपतींनी या बोटीचे एका कार्यक्रमात उद्धाटन केले. या बोटीचे वजन तब्बल सहाशे टन आहे.