VIDEO : म्यानमारच्या खाणीमध्ये भूस्खलन; १६२ लोकांचा मृत्यू.. - म्यानमार जेड खाण भूस्खलन
म्यानमारमध्ये असलेल्या एका खाणीमध्ये भूस्खलन झाल्यामुळे तब्बल १६२ कामगारांचा मृत्यू झाला. देशाचे अग्नीशामक दल आणि इतर आपात्कालीन यंत्रणा बचावकार्य करत आहेत. १२ तासांनंतर सुमारे १६२ मृतदेह काढण्यात यश आले आहे. जगातील सर्वात मोठ्या जेड खाणींपैकी एक ही खाण आहे. पावसाळ्यामध्ये शक्यतो खाणकाम बंद ठेवण्यात येते, मात्र तरीही येथे कोणतीही सुरक्षा न बाळगता कसे काम सुरू ठेवले होते याबाबत आता सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे...