अध्यक्षीय डिबेटमध्ये ट्रम्प यांनी कोरोना बळीं बाबत भारतावर केला खुप मोठा आरोप, म्हणाले....
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अध्यक्षपदाचे उमेदवार जोई बिडेन यांच्या दरम्यान पहिला अध्यक्षीय वाद-विवाद (प्रेसिडेंशिअल डिबेट) आज (बुधवार) पार पडली. केस वेस्टर्न यूनिवर्सिटी, क्लीवलँड (ओहायो ) मध्ये 90 मिनिटे हा वादविवाद (डिबेट) चालला. यामध्ये कोविड-१९ महामारीला लढा देण्यासाठी ट्रम्प यांच्याकडे कोणतीही योजना नाही, अशी टीका बिडेन यांनी केली. त्यावर बोलताना ट्रम्प म्हणाले, की अमेरिकेतील कोरोना मृत्यूंची संख्या ही इतर देशांच्या तुलनेत खूप कमी आहे. "आकडेवारीबाबत बोलायचे झाल्यास, तुम्हाला चीन, रशिया आणि भारतात किती लोक मरण पावले आहेत याची कल्पना नाही. हे देश मृतांचे खरे आकडे जाहीर करत नाहीत" असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले.