श्रीलंका निवडणूक: प्रतिस्पर्धी उमेदवाराला नमवण्यासाठी घेतला जातोय 'फेक न्युज'चा सहारा- नालका गुणवर्धने - Sri Lankan Presidential election
कोलंबो - श्रीलंकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आज सुरू आहे. राष्ट्राध्यक्षपदाची ही आठवी निवडणूक आहे. या निवडणुकीत तब्बल ३५ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक काळात मुख्य प्रवाहातील माध्यमे आणि सोशल मीडियातील माहितीकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. मात्र, उमेदवारांच्या प्रचार अभियानाद्वारे खोट्या बातम्या आणि चुकीची माहिती परवण्याचा धोका वाढला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेतील परिस्थिती जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारतने प्रसिद्ध माध्यम विश्लेषक नालका गुणवर्धने यांच्याशी चर्चा केली. निवडणुकीमध्ये खोट्या आणि चुकीच्या माहितीचा मतदारांवर कसा परिणाम होऊ शकतो, याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली आहे. या निवडणुकीमध्ये उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात विरोधी उमेदरावारबाबत खोटी माहिती परसवण्यात येत आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांची प्रतिमा, विचार, हेतू मलिन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात येत असल्याचे मत त्यांनी मांडले. पाहुया याबाबतची विशेष चर्चा....