Russia-Ukraine Conflict : 'आम्हाला मदत करा', युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे सरकारकडे आवाहन - रशिया-युक्रेन युद्ध
रशिया-युक्रेन युद्धाची भीती अखेर खरी ठरली. रशियाने गुरुवारी युक्रेनवर चौफेर हल्ले केले. त्यात 74 लष्करी तळ उद्ध्वस्त झाले असून, 40 सैनिकांसह 10 नागरिक ठार झाले. या युद्धखोरीचा निषेध करत पाश्चात्य देशांनी रशियावर आणखी निर्बंध लागू करण्याची घोषणा केली. या घडामोडींमुळे युद्धाचा झाकोळ जगभर पसरला आहे. युक्रेन आणि रशियामध्ये कालपासून युद्ध सुरू झालं असून युक्रेनमध्ये 15 हजारहून अधिक विद्यार्थी हे युक्रेनमध्ये अडकलेले ( Indian Students in Ukraine ) आहे. या विद्यार्थ्यांना मदतीची अपेक्षा असून सरकारच्यावतीने आम्हाला मदत करण्यात यावी, असं आवाहन हे विद्यार्थी करत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST