VIDEO : राम नवमीनिमित्ताने काश्मिरी पंडितांच्या आश्रमाचे उद्घाटन; रामजन्मोत्सव साजरा - श्री रामनवमी उत्सव 2022
पुणे - मुळशी तालुक्यातील सुस गाव येथे काश्मिरी पंडितांच्यावतीने भगवान श्री गोपीनाथजी महाराज आश्रम तयार करण्यात आलं आहे. आज रामनवमी निमित्ताने या आश्रमाचं उदघाटन करण्यात आलं. तसेच येथे राम जन्मोत्सव, श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष पठण, महापूजा, पालखी, श्रीरामजन्म सोहळा अशा धार्मिक कार्यक्रमांबरोबरच भक्तीप्रवचन, सांगितीक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. रामनवमीच्या निमित्ताने शहरातील विविध मंदिरात राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST