Imtiaz Jalil : इम्तियाज जलील माझे वर्गमित्र मात्र, एमआयएमला महाविकास आघाडीत घेण्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील : राजेश टोपे - Imtiaz Jalil Rajesh Tope
जालना : इम्तियाज जलील माझे वर्गमित्र मात्र, एमआयएमला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील( MIM Proposal To MVA ) , अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय ( Rajesh Tope On Imtiaz Jalil ) . ते जालन्यात बोलत होते. जलील यांनी अनौपचारिक गप्पा मारताना माझ्याकडे महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव ठेवला, असंही ते म्हणाले. मुस्लिम बहुल समाजाचे प्रश्न सोडवणाऱ्या पक्षांसोबत आम्ही यायला तयार आहोत, असंही जलील यांनी प्रस्ताव ठेवताना सांगितलयाचं टोपे म्हणाले. दक्षिण कोरिया, चीन आणि युरोपातील काही देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत ( Covid Fourth Wave ) आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना अलर्ट जारी केला आहे. याबाबतचे पत्र आम्हाला मिळाले असून, त्यानुसार योग्य ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचेही टोपे म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST