महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Devendra Fadnavis : १९८९ मध्ये मी स्वतः कश्मीरला जाऊन परिस्थिती अनुभवलीय.. देवेंद्र फडणवीसांनी पहिला 'द कश्मीर फाईल्स' - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Mar 22, 2022, 10:59 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

मुंबई : द कश्मीर फाईल चित्रपट बघून मी निशब्द झालेला आहोत, हा चित्रपट कोणत्याही धर्मविरोधी नसून देशविरोधी लोकांच्याविरोधात असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस आणि भाजप आमदारांनी विधानसभा शेजारी असलेल्या आयनॉक्स सिनेमागृहात 'द कश्मीर फाईल' हा चित्रपट बघितला. यावेळी फडणवीस बोलत होते. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज द कश्मीर फाईल्स हा चित्रपट ( Devendra Fadnavis Watched The Kashmir Files ) पहिला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, 'सर्वांनी हा सिनेमा पाहावा. विशेषतः सेक्युलर जमातींनी तर नक्कीच पाहावा. हा सिनेमा कुणाच्या विरोधात नाही. इतिहासातील काही पान काढून टाकण्यात आली होती. ती या सिनेमाच्या माध्यमातून समोर आली आहेत. सिनेमात मांडण्यात आलेली परिस्थिती भयावह आहे. पंतप्रधान मोदीजींनी आमचं स्वप्न कलम ३७० हटवून पूर्ण ( Devendra Fadnavis On Article 370 ) केलं आहे. ३७० कलम काढल्याने भारतविरोधी कारवाया कमी झाल्यात. खरा इतिहास समोर आणल्याबद्दल मी सर्व टीमचं अभिनंदन करतो', असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्या मेहुण्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर फडणवीस म्हणाले ( ED Action On Shridhar Patankar ) की, यंत्रणा आपलं काम करत आहेत. माझ्याकडे यापेक्षा जास्त माहिती नाही, मी यावर काही बोलणार नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details