Chandrakant Patil on Anil Parab : मी इशाऱ्यांना घाबरत नाही - भाजप नेते चंद्रकांत पाटील - अनिल परब रिसोर्ट चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया
कोल्हापूर - अनिल परब यांचे दापोली येथील रिसॉर्ट तोडण्यासाठी ( Chandrakant Patil on Anil Parab ) भाजप नेते किरीट सोमैया प्रतिकात्मक हातोडा घेऊन आपल्या निवासस्थानावरून दापोलीत पोहचले. मात्र, रिसॉर्टवर जाण्यापासून पोलिसांनी रोखले. त्यामुळे, सोमैया यांनी तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. शिवाय काल शुक्रवारी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना थकबाकीच्या मुद्द्यावरून माहिती न घेता आरोप केल्याचे म्हणत इशारा दिला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा आपण कोणत्याही इशाऱ्याला घाबरत नाही, असे म्हटले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST