Guardian Minister Chhagan Bhujbal : मी भविष्यकार नसून भाजीवाला आहे ; पालकमंत्री छगन भुजबळ यांचे वक्तव्य - Kirit Somaiya in Kolai
येवला ( नाशिक ) : पालकमंत्री छगन भुजबळ ( Guardian Minister Chhagan Bhujbal ) आज येवला येथे विविध विकास कामाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना पत्रकारांनी विचारले की, पाच राज्यात निवडणुका सुरू असून यामध्ये भाजपला यश मिळेल का? यावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले ( Guardian Minister Chhagan Bhujbal Statement ) की, मी चंद्रकांत दादा पाटील यांच्यासारखा सारखा भविष्यकार नसून भाजीवाला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची जागा पहाण्यासाठी ( Rashmi Thackeray Bungalow in Kolai ) किरीट सोमय्या हे कोर्लई गावात दाखल झाले ( Kirit Somaiya admitted to Korlai village ) आहेत त्याबद्दल विचारले असता भुजबळ म्हणाले, त्या गावातील जागेची माहिती माध्यमांमधून दाखवण्यात आली आहे. परंतु त्यामध्ये तिथे तर पडकी घरे असल्याचे दिसत आहे. भुजबळ फार्महाऊसवर पाहणी केल्या प्रकरणी किरीट सोमय्या यांना नोटीस ( Notice to Kirit Somaiya ) देण्यात आलेली आहे. या बद्दल भुजबळ म्हणाले की, तो सांताक्रूझ येथील बंगला आहे. या ठिकाणी किरीट सोमय्या काही लोकांना घेऊन गेले होते. मात्र पोलिसांनी गर्दीमुळे किरीट सोमय्यांची तब्येत बिघडू नये, याकरता पोलिसांनी नोटीस बजावली होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST