VIDEO : पुण्यातील बेकरीला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही - बेकरीला लागली आग
पुणे - शिवणे येथील देशमुखवाडीतील बेकरीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या चार बबांच्या साह्याने आगीवर एका तासाने नियंत्रण मिळवले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. या आगीत बेकरी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. आगीमुळे बाजूच्या दुकानांचेही मोठे नुकसान झाले आहे. असे असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST