VIDEO : तीव्र उन्हात डोळ्यांनी काळजी कशी घ्यावी; नेत्ररोग तज्ञ डॉ. सोनिया भाला यांचा सल्ला - how to take care of eyes
नाशिक - राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे,बहुतेक शहरात तापमान 40 अंश सेल्सियस पर्यंत जाऊन पोहचले आहे. अशात तीव्र उन्हात घराबाहेर पडतांना अनेकांना डोळ्याची समस्या जाणवत आहे. डोळे कोरडे पडणे, लाल होणे, डोळे चुरचुरणे या समस्या भेडसावत आहे. अशात घराबाहेर पडतांना नागरिकांनी डोक्यावर टोपीचा करणे .पोलोराईज ग्लास किंवा युबी प्रोटेक्टीव्ह ग्लासच्या गॉगल्सचा वापर करावा. तसेच आहारात नैसर्गिक पेय ज्यात उसाचा रस, ताक, नारळ पाणी आणि फळांमध्ये टरबूज, खरबूज, आंबा, द्राक्ष याचे सेवन करण लाभदायक आहे. उन्हाळ्यात मसाल्याचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे असा सल्ला वैद्यकीय सल्ला नेत्ररोग तज्ञ डॉ सोनिया भाला यांनी दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST