VIDEO : उन्हाळ्यात त्वचेची कशी काळजी घ्याल? सांगतायेत वैद्य विनायक खडीवाले - उन्हाळ्या पुणे न्यूज
पुणे :- राज्यात उष्णतेचा पारा अधिकच वाढताना दिसत आहे.सध्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होताना दिसत आहे. उन्हाळा सुरु झाल्यावर ऋतूतील झालेल्या बदलांमुळे विविध प्रकारचे आजार उद्भवतात. यात प्रामुख्याने त्वचाविकार तसेच उष्माघाताचा समावेश आहे. उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी प्रतिबंधक उपायाबरोबरच काही दक्षता आणि खाण्यापिण्यावर बंधने ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये साधारणत: सर्वत्र उष्णतेमुळे जाणवणारा दाहक परिणाम म्हणजे उष्माघात. यामध्ये शरीराचे तापमान उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्ती दगावण्याची शक्यता असते.अश्या या उष्णतेच्या वातावरणात आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजे याबाबत वैद्य विनायक खडीवाले यांनी माहिती दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST