Video : कराड तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा; झाडे, वीजेचे खांब कोलमडून पडले - कराडमध्ये वादळी पाऊस
कराड (सातारा) - विजांचा कडकडाट आणि वादळी वार्यासह झालेल्या पावसाने कराड तालुक्याला झोडपून काढले. वार्याच्या प्रचंड वेगामुळे घरावरील पत्रे कागदासारखे उडून गेले. कराडच्या मुख्य बाजारपेठेत रस्त्याकडेला उभे केलेले पत्र्याचे बोर्ड वार्यामुळे पळताना पाहायला मिळाले. दत्त चौकातील एका लोखंडी अँगलवरील बॅनर हवेत गिरक्या घेताना दिसला. तर एक तगडाचा बॅनर वार्याच्या वेगाने येऊन मोपेडवर आदळताच गाडी पडल्याचे दृश्य नागरिकांनी मोबाईल कॅमेर्यात कैद केले. ग्रामीण भागात वीजे खांब कोलमडून पडले. तसेच झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. उभी पिके आडवी झाल्याचेही दृश्य पाहायला मिळाले. यामुळे विजापूर-गुहागर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST