VIDEO : विदर्भात उष्णतेची लाट; वर्ध्यात धावत्या कारने घेतला अचानक पेट - विदर्भात उष्णतेनेचालत्या कारने घेतला पेट
वर्धा - वर्ध्याच्या देवळी मार्गावरील भदाडी नदीच्या पुलावर एकामागून एक दुर्घटना घडत असताना आज कारने अचानक पेट ( speeding car burns on the road in Wardha) घेतला. ही घटना आज दुपारी घडली. कारच्या बोनेटमधील वायरिंग जळून आग लागल्याचे बोलले जात आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरसरा येथील कुटुंब वर्ध्यातील नातेवाईक यांच्याकडे येत असताना कारने अचानक पेट घेतल्याचे लक्षात येताच, सहा जण कार बाहेर पडल्याने बचावले. यात कार मात्र पूर्णतः जळून खाक झाली. देवळीच्या अग्निशामक बंबाच्या साह्याने पाण्याचा मारा करत आग विझवण्यात आली. सध्या विदर्भात तापमान वाढत असल्याने आगीचा घटना वाढत ( Heatwave in Vidarbha) असल्याचे चित्र निर्माण झाले आहे हे विशेष.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST