महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : ग्रामीण जनतेसाठी खेडमध्ये महाआरोग्य शिबीराचे आयोजन - मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

By

Published : Feb 21, 2022, 3:43 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

रत्नागिरी - ग्रामीण भागातील व्यक्ती आर्थिक अडचणींपायी आरोग्याकडे आणि आजारांच्या उपचाराकडे दुर्लक्ष करतात. अशाच खेडमधील ग्रामीण जनतेसाठी शिवसेना आमदार योगेश कदम यांनी आरोग्य शिबीर घेतले. यातून ह्रदय रोगासारख्या आजारांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. खेड तालुक्यातील भरणे येथील हॉटेल बिसू येथे भरणे जिल्हापरिषद गटासाठी तर तळे येथील हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये तळे जिल्हापरिषद गटातील नागरिकांसाठी योगेश कदम यांच्याकडून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात किडनी स्टोन शस्त्रकिया, डोळे तपासणी, रक्तशर्करा तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. सकाळी १० ते संध्याकाळी ५ या कालावधीत येथे सर्वसाधारण आरोग्य तपासणी व मोफत औषध पुरवठा देखील करण्यात येत आहे. यावेळी मोफत चष्मे वाटप व कार्डियोग्राम सुविधा देखील यावेळी देण्यात आली. तळे-भरणे येथे एकूण 1450 जणांनी लाभ घेतला. यामध्ये 651 जणांना चष्मे वाटप करण्यात आलं, तर मोतीबिंदूचे 120 रुग्णांनी तर फुरुस-भोस्ते येथे 2000 जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details