शहादा तालुक्यात गारपीट; हरभरा, पपईसह केळी पिकाच्या नुकसानीची शक्यता - Hailstorm in Shahada taluka
नंदुरबार - मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात गारपीटीची शक्यता होती. आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शहादा तालुक्यातील बामखेडासह परिसरात गारपीट झाली. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात सात ते नऊ मार्च या दरम्यान अवकाळी पावसासह गारपीटची शक्यता व्यक्त केली होती. आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शहादा तालुक्यातील बामखेडा, जयनगर, तोरखेडा, हिंगणी परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. या गारपीट आणि वाऱ्यामुळे गहू, हरभरा आणि रब्बी ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST