VIDEO : 36 व्या वर्षी दहावी पास झालेली महिला झाली शिक्षिका; पुण्याच्या महिलेचा जिद्दीचा प्रत्यय - पुणे गुलनार ईराणी दहावी पास 36 व्या वर्षी
पुणे - शिक्षण असो की अन्य क्षेत्र हमखास यश मिळविण्यासाठी आधी पाया पक्का करा, फोकस नीट ठेवा, जिद्द, चिकाटी व मेहनत हे गुण आत्मसात करा, असे सांगितले जाते आणि अश्या या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेकांनी यश संपादन केले जाते. पुणे शहराला विद्येच माहेरघर म्हटले जाते. (Uneducated Gulnar becomes an Iranian teacher) या विद्येच्या माहेरघरात एक 36 वर्षीय महिला कधीही शाळेत गेलेली नसताना ती आज एका शिक्षकाची भूमिका बजावत आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथे राहणाऱ्या गुलनार ईराणी या कधीही शाळेत न जाता दहावी उत्तीर्ण केली आहे. त्या सध्या समाजातील तसेच परिसरातील मुलामुलींना शिक्षणाची धडे देत आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग (एनआयओएस)मध्ये दहावीची परीक्षा दिली आणि जानेवारी (2022) मध्ये ती उत्तीर्ण झाली. वयाच्या (36)व्या वर्षी दहावीची परीक्षा दिली आणि ती त्यात उत्तीर्ण देखील झाली आहे. पाहा, या महिलेच्या जिद्दीचा प्रवास...
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST