Gudhipadwa 2022 : कोल्हापुरात ढोल, ताशांच्या गजरात गुढीपाडवा शोभायात्रेचे आयोजन - हिंदू नवीन वर्ष २०२२
कोल्हापूर : तब्बल दोन वर्षांनंतर राज्यामध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करताना पाहायला मिळत ( Gudipadva procession in Kolhapur ) आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ढोल ताशाच्या गजरात हिंदू नवीन वर्षाचे स्वागत केले जात ( Hindu New Year 2022 ) असून, कोल्हापुरात मोठ्या जल्लोषात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. करवीर गर्जना ढोल ताशा पथकतर्फे शहरातील विविध रस्त्यावरून ही शोभायात्रा जात असून, ढोल ताशाच्या गजरात आणि ध्वज नाचवत तसेच चित्ररथ सादर करत मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येत आहे. दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त सण साजरा होत असल्याने ढोल ताशा वादक तसेच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. येथून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नयन यादवाड यांनी.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST