Gudi Padawa Festival : निर्बंधमुक्त महाराष्ट्रातील गुढीपाडवा पहिला सण, ठिक-ठिकाणी नववर्षाचे जल्लोषात स्वागत - गुढीपाडवा सण
हैदराबाद - हिंदू परंपरेतील गुढीपाडवा हा महत्वाचा सण आहे. आजपासून नववर्षाची सुरूवात होते. राज्य सरकारच्या मास्कमुक्त आणि निर्बंधमुक्त निर्णयामुळे गुढीपाडवा उत्सवामध्ये चैतन्य दिसून आले. निर्बंधमुक्त महाराष्ट्रातील हा पहिला सण आहे. राज्यभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी लेझीम, शोभायात्रा, तलवारबाजी, फुगडी, पारंपारिक वेशभूषा, शिवाजी महारांजी वेशभूषा, श्रीराम यांची पालखी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळपासून पालखी, दिंडी आणि शोभायात्रेला सुरूवात झाली आहे. नागपूर, दादार, ठाणे, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक, गिरगाव, शिर्डी यासह अनेक ठिकाणी गुढीपाडवा सण उत्साहात आणि शांततेत पार पडला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST