गोवा निवडणूक चौपाल : 'यामुळे' आहे उत्पल पर्रीकरांचा मार्ग खडतर, जाणून घ्या गोवेकर पत्रकारांचे निवडणूक भाष्य
पणजी (गोवा) - गोवा विधानसभा निवडणूक 2022 ( Goa Assembly Elections 2022 ) साठी मोठ्या उत्साहात मतदान सुरू आहे. नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले आहेत. यावर्षी गोव्यात सरकार कोणाचे येईल याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता आहे. मात्र निकाल येण्यापूर्वी येथील ग्राउंडवर काम करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार ईटीव्ही भारतशी प्रतिक्रिया दिली आहे. गोव्यात भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तृणमुल कॉंग्रेस, महाराष्ट्रवादी गोमंतक यांचे 301 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचे नशीब आज ईव्हीएम बंद होईल. 10 मार्च रोजी निकाल आहे. त्याआधी गोव्याच्या राजकारणात नेमके काय चित्र असणार आहे. याबद्दल मोठी विधाने येथील गोवेकर पत्रकारांनी केली आहेत. पणजी मतदार संघातील उत्पल पर्रीकर आणि बाबुश मोंशरात यांच्यातील मुख्य लढतीवर सर्वांचे लक्ष लागून आहे. तर गोव्यात कोणाचे पारडे किती जड होईल यांचा सविस्तर अंदाज हा येथील पत्रकारांनी सांगितला आहे. कोणला कोणत्या मतदार संघात कोणत्या अडचणी आहेत. तर कोणते प्रश्न विधानसभेच्या निकालावर परिणाम करतील याचा सविस्तर आढावा घेणारा हा विशेष व्हिडिओ...
Last Updated : Feb 3, 2023, 8:12 PM IST