VIDEO : माघी पौर्णिमेनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात द्राक्ष वेलींची सजावट - Maghi Pournima Vithhal Rukmini Temple Pandhapur
पंढरपूर - माघी पौर्णिमा निमित्त श्री. विठ्ठल रूक्मिणी मातेच्या मंदिरात सुंदर द्राक्षाची आरास करण्यात आली आहे. ( Maghi Pournima Vithhal Rukmini Temple Pandhapur ) श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा गाभारा अशा सुंदर द्राक्षवेल यामुळे अधिकच खुलून दिसत होता. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील 400 किलो द्राक्षे वापरण्यात आले. यातून वेगळे रूप विठ्ठल रुक्मिणी मातेचे पाहावयास मिळाले. मात्र, द्राक्षाची आरास तयार करणाऱ्या भाविकांचे नाव मात्र गुपित ठेवण्यात आले आहे. कोरोना पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची मुखदर्शन सुरू आहे. ( Vithhal Rukmini Mukhdarshan ) तर कोरोना नियमांचे पालन करून वारकरी भाविकांना मंदिरात सोडले जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST