गोंदिया : जिल्हा परिषद शाळेतील शालेय पोषण आहार निकृष्ठ दर्जाचे - प्राथमिक शिक्षणाधिकारी
गोंदिया - गोंदिया तालुका येथील जिल्हा परिषद शाळा, चंगेरा येथे धक्कादायक प्रकरण समोर आले. आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या आठच्या विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या धान्यात मोठ्या प्रमाणात कचरा, धूळ, सिमेंट व गुटख्याची रिकामी पाकीटे आढळल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते केतन तुरकर यांनी शाळेला भेट देत शालेय पोषण आहाराची पाहणी केली. त्यानंतर पोषण आहार अधीक्षकांना शाळेत पाचारण करुन शाळेत आलेल्या सर्व शालेय पोषण आहारातील निकृष्ट धान्याच्या पंचनामा करवून घेतला. त्यानंतर शालेय पोषण आहारातील ही पोलखोल उघडकीस आली आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे म्हणाले, याबाबत अहवाल मागवला असून अद्याप अहवाल आलेला नाही. अहवाल आल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई करू.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST