Goa Cabinet Sworn Celebration : पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रमोद सावंतांसह नऊ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा; पाहा VIDEO - Goa Cabinet was sworn in
पणजी - विधानसभा निवडणुकीत बहुमत प्राप्त झाल्यानंतर डॉ. प्रमोद सावंत ( Dr. Pramod Sawant ) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शपध घेतली. प्रमोद सावंत हे गोव्याचे चौदावे मुख्यमंत्री झाले आहेत. डॉ. सावंत यांच्यासह एकूण नऊ जणांनी यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये माजी आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले गोव्यातील भाजपाचे महत्त्वाचे नेते विश्वजीत राणे, नीलेश काब्राल, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, रोहन खवाटे, गोविंद गवाडे, मोविन गुदीनो, बाबुश मोन्सरात यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ ( Goa Cabinet sworn in panji ) दिली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपाचे प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा गोव्यातील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये पार पडला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST