खासदार सर्दिन यांनी मनोज पर्रीकरांवर केलेल्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध - खासदार सर्दिन विधान मनोहर पर्रीकर
पणजी (गोवा) - मनोहर पर्रीकर यांच्यावर काँग्रेस पक्षाचे खासदार फ्रान्सिस सर्दीन यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपने आज पत्रकार परिषदेत निषेध केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी आज पात्रकर परिषद घेऊन सर्दीन यांचा समाचार घेत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना खडे बोल सुनावले. राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार असल्याचे संकेत मिळताच काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली, म्हणून काँग्रेसचे नेते उद्विग्न होऊन अशी वक्तव्य करत असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST