VIDEO : गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात - गोवा विधानसभा निकाल लाईव्ह
मडगाव - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीचे (Goa election assembly 2022) निकाल काही वेळातच हाती यायला सुरुवात होणार आहे. गोव्याच्या राजकारणातील महत्त्वाचा भाग असलेल्या दक्षिण गोव्यातील मडगाव येथे एकूण 21 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. इथल्या दामोदर एज्युकेशन कॅम्पस मध्ये ही सगळी मतमोजणी सुरू असून दीडशेहून अधिक उमेदवार या ठिकाणी आपलं भवितव्य आजमावत आहेत. सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST