चिखलदऱ्यात पर्यटकांची हुल्लडबाजी, हरिकेन पॉईंटवर जीव धोक्यात टाकून फोटोसेशन - Tourist photo session in Chikhaldarya
अमरावती - सेल्फी फोटोच्या नादात अनेक तरुण तरूणींनी आतापर्यंत आपला जीव गमावल्याच्या घटना आपण एकत असतो. परंतु, एवढ्या घटना घडूनही तरुण-तरूणी यातून काहीच धडा घेत नसल्याचे वेळोवेळी समोर येत आहे. जिवापेक्षा फोटो, सेल्फी महत्वाचा आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण अमरावतीच्या चिखलदरा पर्यटन स्थळावर नागपूरमधील तरुणांची हुल्लडबाजी समोर आली आहे. चिखलदऱ्यामधील हरिकेन पॉइंटवर जीव धोक्यात टाकून हजारो फूट खोल दरीच्या काठावरील दगडावर उभे राहून तरुणांनी जीवघेण फोटोसेशन केले आहे. त्यामुळे या हुल्लडबाजाणाचा जीव महत्वाचा नाही का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.