कोल्हापूर-शिरोळची पूरस्थिती गंभीर, लष्कराच्या मदतीने हजारो लोकांचे स्थलांतर - कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाच्या बातम्या
कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेवाडी-प्रयाग चिखलीमध्ये पूर ओसरत असला, तरी शिरोळ तालुक्यातील पूरस्थिती गंभीर बनत चालली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने, शिरोळ तालुक्यातील बस्तवाड, खिद्रापूर, राजापूर, आकिवाट, सैनिक टाकळी गावातील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जवळपास १५०० पेक्षा अधिक लोकांचे स्थलांतर केले असून, ८०० पेक्षा जास्त लोकांचे स्थलांतर केले आहे. एका साखर कारखान्यात यांची व्यवस्था करण्यात आली आहे. शिरोळ मधील टाकळवाडी येथून याचा आढावा घेतला आहे, ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राहुल गडकर यांनी-