नाल्यावरील पर्यायी मार्ग वाहून गेला, गडचिरोली-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग बंद - Gadchiroli News
गडचिरोली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी नाले असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पर्यायी मार्ग तयार करून नाल्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. सुमारे 100 किमी मार्गावरील विविध ठिकाणी नाल्यांवर पर्यायी मार्ग काढून वाहतूक वळविण्यात आली आहे.