आजारापेक्षा इलाज भयंकर! आर्थिक संकटात असलेल्या पालकांना दीड-दोनशे रुपयांसाठी हजार रुपायांचा बुर्दंड - What is the government's decision on school nutrition?
उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वितरित न करता, तो अनुदान स्वरूपात थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हे खाते खोलने अनेक पालकांना परवडणारे नाही. त्यामुळे हा निर्णय रद्द करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.