महाराष्ट्र

maharashtra

Maratha Reservation

ETV Bharat / videos

Maratha Reservation : आईच्या भेटीनं जरांगे पाटलांना अश्रू अनावर - Manoj jarange met Mother

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2023, 5:58 PM IST

जालना :यापुढे मराठा आरक्षणासाठी समाजाचा एकही मुडदा पडू देणार नाही, हे आंदोलन मराठ्यांच्या कोट्यवधी पोरांचं कल्याण करेल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज आंबड तालुक्यातील अंतरवली सराटी गावात बोलत होते. मराठ्यांच्या पदरात आरक्षणाचं दान पडल्याशिवाय शांत बसणार नाही, असा विडा मी उचलल्याचं देखील पाटील म्हणाले. आज जरांगे पाटलांच्या आईनं उपोषणस्थळी भेट देत जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी आईला पाहून जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले. आई व्यासपीठावर दाखल होताच जरांगे यांनी त्यांचे आशीर्वाद घेत गळाभेट घेतली. तसंच आईला देखील यावेळी हुंदके आवरता आले नाहीत. उपस्थित असलेल्या महिलांनी त्यांच्या आईला धीर देत आधार दिलाय. माझ्या पोराला न्याय द्यावा,अशी मागणी प्रयगाबाई जरांगे यांनी राज्य सरकारकडं केलीयं.

ABOUT THE AUTHOR

...view details