यंदा लाडक्या बाप्पासाठी झटपट 'असे' तयार करा मूग डाळीचे मोदक - लाडक्या बाप्पासाठी मोदक
लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाची सर्वांना ओढ लागली आहे. मोदक हा गणपतीचा सर्वात आवडता प्रसाद आहे. विविध प्रकारे मोदक बनवून भाविक गणपती बाप्पाला प्रसाद अर्पण करतात. यंदा लाडक्या गणपती बाप्पासाठी तुम्ही मूग डाळीचे मोदक तयार करू शकता. मूग दाळीचे मोदक तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी सामग्री आपल्या शरीरासाठी पोषक असते. मुगापासून बनवलेले हे मोदक केवळ चवीलाच चवदार नसतात, तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर असतात. चला तर मग जाणून घ्या सोपी मूग डाळ मोदक रेसिपी.