#Christmas2020: 'बेरी ब्राऊनी पिझ्झा' करेल तुमचा ख्रिसमस खास! - etv bharat Priya
हैदराबाद - रेग्युलर पिझ्झा खाऊन तुम्ही कंटाळला आहात का? तर मग आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, एक 'चॉकोलिशिअस' ट्रीट! 'बेरी ब्राऊनी पिझ्झा' हा बेरीज् आणि विविध फळांपासून बनलेला एक गोड पदार्थ आहे. फळांचे, स्ट्रॉबेरीचे काप आणि चॉकलेट सिरपने सजवलेला हा पिझ्झा खाण्यापासून तुम्ही स्वत:ला रोखूच शकत नाही.