VIDEO : मराठी रंगभूमीवरील पाहिले ब्लॅक अँड व्हाइट नाटक 'द क्लॅप' - मिलाफ संस्था
पुणे : मराठी रंगभूमीवरील पहिले ब्लॅक ॲण्ड व्हाइट नाटक द क्लॅप आज सादर होणार आहे. मिलाफ या संस्थेकडून सदर नाटक आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातील हास्य रसिकांना हसवणारे चार्ली चॅप्लिन यांच्या आयुष्यावर आधारित हे नाटक आधारित आहे. या नाटकांमध्ये चार्ली चॅप्लिन यांच्या आयुष्यातील अनेक लोकांचे त्यांच्याबद्दल दृष्टिकोन काय होते. किंवा त्यांचे आयुष्य कसे घडत गेलं याबद्दलची एक सुंदर अशी रुपरेषा आपल्याला यात पाहायला मिळेल. हे एक मिंग्लिश पद्धतीचे नाटक आहे. पहिल्यांदाच मराठीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर मिलाफ संस्थेतर्फे हे नाटक आयोजित केले आहे. कोरोनाच्या कालखंडानंतर प्रायोगिक रंगभूमीकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलत आहे. आणि लोकांना जास्तीत जास्त याला प्रतिसाद द्यावा, असे या संस्थेचे फाउंडर आणि नाटकाचे दिग्दर्शक प्रणव जोशी यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST