Aurangabad Hotel Fire : रेल्वेस्टेशन परिसरातील हॉटेलमध्ये भीषण आग; सुदैवाने जीवित हनी टळली - Fire in Aurangabad hote
औरंगाबाद - रेल्वे स्टेशनजवळील लालाजी एक्झिक्यूटिव्ह ( Lalaji Executive hotel ) नावाच्या हॉटेलच्या पाचव्या मजल्याला ( Fire near rail station in Aurangabad ) आग लागली आहे. कॅफेमध्ये बॉयलरने पेट घेतल्याने आजूबाजूला असलेल्या लाकडांनी ( Fire in Aurangabad hotel ) पेट घेतला. या आगीमुळे रौद्ररूप धारण केले होते.अचानक लागलेल्या आगीमुळे हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांची चांगलीच धावपळ उडाली. सुदैवाने ग्राहकांना बाहेर काढण्यात यश आले. यामुळे मोठी जीवित हानी टळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST