महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Farmer Plowed On Onion : येवल्यात साडेतीन एकर कांद्यावर फिरविला नांगर - nashik latest news

By

Published : Apr 5, 2022, 7:46 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

येवला (नाशिक) - कांद्याचे सतत कोसळणारे भाव तसेच मजुरीचे दर गगनाला भिडल्याने कांदा शेतीचा ताळमेळ बसत नाही आहे. याला कंटाळून येवला तालुक्यातील ठाणगाव येथील शेतकरी रामदास गरूडे यांनी आपल्या उभ्या साडेतीन एकर पिकावर नांगर फिरवला ( Farmer plowed on onion farm in Yeola ) आहे. या शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने उन्हाळा कांद्याचे पीक घेतले होते. मात्र रोगाचा प्रादुर्भाव, निसर्गाचा लहरीपणा, मजुरांचे गगनाला भिडलेले भाव तसेच सतत कोसळणारे कांद्याचे दर याचा ताळमेळ बसत नव्हता. यातच संतप्त होत या शेतकऱ्याने आपला साडेतीन एकर कांदा पीक ट्रॅक्‍टरच्या साह्याने नांगरून टाकत टोकाच पाऊल उचलले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details